सार्वजनिक आस्थापना आणि खाजगी आस्थापना यांनी 01 मे 2022 ते 31 मे 2022 पर्यंत तिमाही विवरणपत्र ई आर -1  सादर करावे.

सार्वजनिक आस्थापना आणि खाजगी आस्थापना यांनी 01 मे 2022 ते 31 मे 2022 पर्यंत

तिमाही विवरणपत्र ई आर –1  सादर करावे.

भंडारा दि.5 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय आस्थापना आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नोंदणी कृत अस्थापना, उद्योजक हॉस्पिटल, हॉटेल्स, यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.in या संकेत स्थळावर आपल्याला दिल्या गेलेल्या युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगइन करावे व ई आर -1 विवरण पत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करावे. ई आर -1 विवरण पत्र सादर करणे कायद्याने (CNV Act 1959-60 अन्वये) बंधनकारक आहे, तसे न केल्यास कायद्याने कार्यवाही करण्यात येईल. सर्व आस्थापनांनी तिमाही विवरण पत्र, ई आर -1 विवरण पत्र 60 दिवसाचे (01/04/2022 ते 31/05/2022) आत भरण्यात यावे, तसेच जिल्ह्यातील बऱ्याच आस्थापनांची ऑनलाइन नोंदणी उपरोक्त पोर्टलवर करण्यात आलेली नाही त्यांची माहिती अपूर्ण आहे अशा सर्व आस्थापनांनी या कार्यालयात संपर्क साधून माहिती अपडेट करावी आणि ER -1 भरावे. यासंदर्भात काही अडचण असल्यास या कार्यालयाचे दूरध्वनी क्र.07184-252250 वर संपर्क करू शकता, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांनी कळविले आहे.