जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतीत

पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

भंडारा, दि. 4 : राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 मे 2022, 13 मे ते 20 मे दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 23 मे  2022 रोजी 11 वाजतापासून होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 25 मे 2022 रोजी दुपारी 3 पर्यंत असेल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 25 मे 2022 दुपारी 3 नंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दि. 5जून 2022 रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. 6 जून रोजी मत मोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दि. 9 जून 2022 पर्यंत राहील.