chandrapur I अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक प्रकरणी चार वाहनांवर प्रशासनाची कारवाई

चंद्रपूर जिल्हा भरारी पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता दिनांक 13/05/2021 रोजी सकाळी 4:15 वाजता जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील जिल्हा भरारी पथक बल्लारपूर दौऱ्यावर असतांना मौजा बामणी ता. बल्लारपूर येथील वर्धा नदीपात्रामध्ये अवैध रेती, वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. सदर वाहनाची तपासणी करण्यात येवून विना परवाना रेती वाहतूक करणारे रामु बंडी रा. बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर क्र. एम.एच.34 ए.पी – 2911, पप्पू घोडाम, रा. अमित नगर, बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर एम.एच.34 बी.एफ 9422, आरोफ शेख, रा.अमित नगर बल्लारपूर यांचे वाहन ट्रॅक्टर एम.एच.34 एल – 9998, व महेंद्र डाखरे, रा.बल्लारपूर यांचे नंबर नसलेला एक वाहन ट्रॅक्टर असे एकूण 04 ट्रॅक्टर जप्त करून .शंकर खरुले, तलाठी कळमना, तहसिल कार्यालय बल्लारपूर यांचेकडे सुपूर्दनाम्यावर सुपूर्द करण्यात आलेले आहे. उक्त वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 48 च्या पोट कलम (7) (8) च्या तरतुदीन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. असे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कळविले आहे.