chandrapur I जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टॅक्सी उभी करणार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टॅक्सी उभी करणार

जय संघर्ष वाहन चालक / मालक सामाजिक संस्थेचा इशारा

चंद्रपूर/ प्रतिनिधी
मागील वर्षी माह मार्च / 2020 पासुन कोविद 19 च प्रादुर्भावामुळ शासनाने लोक डॉऊन लावलेला होता . त्यानंतर माहे डिसेंबर 2020- जानेवारी 20201 मध्ये थाडी सुट मिळाल्लो आणि ठप्प झालेला टॅक्सी व्यवसाय पुन्हा सुरु झाला होता . परंतु माहे मार्च / 2021 पासुन पुन्हा शासनाने लाकडाऊन सुरु केला . त्यामुळे सर्व पर्यटन स्थळे , मंदीर , यात्रा , लग्न कार्य हे बंद आहेत . तसेच शाळा , कॉलेजेस सुध्दा बंद आहेत . याचा विपरीत परिणाम हा टुरिस्ट टॅक्सी , व्यावसायीक प्रवासी वाहन व्यवसायावर पडला आहे. व्यावसायीक प्रवासी वाहनांचे वार्षिक टैक्स , वाहतुक टॅक्स , इंश्युरन्स , बँक कर्ज हप्ते माफ होणबाबत तसेच वाहन चालकांना आर्थीक मदत करावी, या लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असे न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील व्यावसायीक प्रवाशी वाहन चालक मालक रस्त्यावर उतरतील आणि राज्यातील सर्व वाहन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे करण्यात येईल, असा इशारा जय संघर्ष वाहन चालक / मालक सामाजीक संस्था , चंद्रपूर जिल्हा यांनी दिला आहे.

मागील वर्षी माहे / 2020 पासुन आजपावेतो व्यवसाय बंद असल्यामुळे सध्या वाहनावर असलेले बँकेचे किंवा खाजगी संस्थेचे कर्ज , वाहनाचे इंश्युरन्स , रोड टॅक्स भरायचे कसे असा प्रश्न सर्व व्यावसायीक प्रवासी वाहन मालकांना पडला आहे . त्यामुळे सर्व टुरिस्ट टॅक्सी , व्यावसायीक प्रवाशी वाहन चालक मालकाच्या खालील प्रमाणे मागण्या असून त्यावर आपणाकडुन सहानुभूतीने विचार करण्यात यावा व आर्थीक मदत तसेच सुट देण्यात यावी .

मागण्या : सतत एक वर्षा पासुन व्यावसायीक प्रवासी वाहनांचा व्यवसाय बंद असल्यामुळे वाहनावरील कर्जाचे हप्ते हे किमान सहा महिन्याकरीता विनाव्याजी पुढे ढकलण्यात यावं . बँकांकडुन कोणत्याही व्यावसायीक प्रवासी वाहन मालकावर जोर – जबरदस्ती अथवा फोनद्वार मानसोक आस देणार नाही असे आदेश बँकांना निर्गमीत करावे . ज्या व्यावसायीक प्रवासी वाहनांचे इंश्युरन्स नुतनीकरण केले आहे असे वाहन प्रादेशीक परिवहन अधिकारी यांचे सम्मतीनुसार ( No Use Cetificate ) पाकीग यार्डमध्ये उभे आहे . त्यांचे इंश्युरन्स जेव्हापर्यंत व्यावसायीक वाहनांचा व्यवसाय पुर्ववत सुरु होत नाही तेव्हा पर्यत इंश्युरन्स Extend करण्याचे आदेश संबंधीत प्रादेशीक परिवहन अधिकारी यांना निर्गमीत करावे .
मार्च / 2021 नंतर ज्या व्यावसायीक प्रवासी वाहनांचे टॅक्स भरनेस्ने आहे अशा व्यावसायीक प्रवासी वाहनांच टॅक्स Carry Forward करावे .

मार्च / 2020 पासुन सर्व शाळा , महाविद्यालये बंद आहेत त्यामुळे सर्व स्कुल बस , स्कुल वन यांचे टैक्स शाळा / महाविद्यालये सुरु होत नाही तोपर्यंत माफ करावे . पर्यटन स्थळे , मंदीर , याञा , लग्न समारंभ , शाळा , महाविद्यालय मागील एक वर्षा पासून बंद असल्यामुळे व्यावसायीक प्रवासी वाहन चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलली आहे . त्यामुळे अशा सर्व व्यावसायीक प्रवासी वाहन चालक मालक तसेच स्कुल बस वाहन चालक , कंडक्टर यांना दर महा रुपये 10000 / – उदरनिर्वाहा करीता देण्यात यावी . जणे करुन शाळा बंद असली तरी मुलांचे शिक्षणाची फी , घरभाडे , ईलेक्ट्रीक बील व परिवाराकरीता अन्नधान्याची व्यवस्था करता येईल . यापुर्वी सुध्दा या बाबत आमचे संस्थे कडुन शासनास अवगत करण्यात आलेले आहे . परंतु कोणतीही उचीत कारवाई करण्यात आलेली नाही . वरील सर्व मागण्याचा आपणाकडुन सहानुभूतीपुर्व विचार करुन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात . असे न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील व्यावसायीक प्रवाशी वाहन चालक मालक रस्त्यावर उतरतील आणि राज्यातील सर्व वाहन हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उभे करण्यात येतील .