महाराष्ट्र दिनी उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्र

महाराष्ट्र दिनी उमेदवारांना मिळणार नियुक्तीपत्र

 

भंडारा, दि. 28 : महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील वस्तू सेवा कर विभागामार्फत भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या चार उमेदवारांना तर महसूल विभागातील भुकर मापक 6 उमेदवारांना आणि जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांच्या कडील 2 उमेदवारांना अनुकंपातत्वाद्वारे प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

 

उर्वरीत उमेदवारांना 2 मे व 3 मे रोजी संबंधित नियुक्ती प्राधिकारी नियुक्तीपत्रे देतील. असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.