बहुजन समाज पार्टीतर्फे रमजान ईदनिमित्य पुस्तकांचे वितरण 

बहुजन समाज पार्टीतर्फे रमजान ईदनिमित्य पुस्तकांचे वितरण 

बहुजन समाज पार्टी ,बहुजन विध्यार्थी फेडरेशन व डॉ .अब्दुल कलाम विचारमंच तालुका सिंदेवाहीच्या वतीने मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद पर्वानिमित्य सिंदेवाही शहरातील मुस्लिम समाजातील शालेय विद्यार्थ्यांना “डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश” ह्या पुस्तकांचे पेन व नोटबुक साहित्य वितरण करण्यात आले .

या शैक्षणिक साहित्याचे वितरण सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण सिंदेवाही, जामा मस्जिद अध्यक्ष चांदभाई शेख ,मुख्याध्यापक जमील शेख,नगरसेवक युनूस शेख, प्रा .भारत मेश्राम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी बसपा चे शहर अध्यक्ष डॉ .रेवानंद बांबोळे ,मुस्लिम भाईचारा कमिटीचे बिस्मिल्ला पठाण ,मुस्लिम बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.