सामाजिक न्याय पर्व 2023 अंतर्गत जात पडताळणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

सामाजिक न्याय पर्व 2023 अंतर्गत जात पडताळणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

 

भंडारा, दि. 21 : सामाजिक न्याय पर्व 2023 या मोहिमेअंतर्गत ओयासिस कॉलेज भंडारा येथे जात प्रमाणपत्र पडताळणी विषयी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

समिती कार्यालयाचे व्यवस्थापक उमेश पोटदुखे यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन केले. जेईई, नीट व सीईटीच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतेवेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी वेळेवर जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक लाभापासून वंचित राहू नये याकरिता विद्यार्थ्यांनी वेळेवर bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज सादर करून मुळ कागदपत्रे अपलोड करावी व त्या अर्जाची प्रत प्रत्यक्षपणे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे सादर करावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या प्रकरणात वेळेवर निर्णय घेता येईल असे श्री. पोटदुखे यांनी मार्गदर्शन करतेवेळी सांगितले.