राज्य क्रीडा पुरस्कारांसाठीच्या हरकतींचे निराकरण ऑनलाईन

राज्य क्रीडा पुरस्कारांसाठीच्या हरकतींचे निराकरण ऑनलाईन

 

भंडारा, दि. : क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठाचा अलेला शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

 

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकुण गुणांकनासह संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार (Award) टॅब मध्ये दि.13 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत प्रकाशित करण्यात आलेला आहे.

 

प्राथमिक छाननी गुणांकन तक्त्यात नमूद केलेल्या माहिती संदर्भात आक्षेप अथवा हरकती असल्यास त्या दि.13 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीपर्यंत संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई-मेल आयडीवर विहीत नमुन्यात कळविण्यात याव्यात, असे जिल्हा क्रीडा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

विहीत नमुना संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “ताज्या बातम्या (Latest News) ” मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या आक्षेप/हरकतींचे निराकरण / स्पष्टीकरण दि.15 ते 17 एप्रिल, 2023 या कालावधीत संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील “पुरस्कार (Award) ” टॅब मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.