पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

पोलीस पाटील पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

 

भंडारा,  : तुमसर उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 17 ते 27 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज sdotumsarpolicepatil.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील पदभरती प्रक्रीया समिती बी. वैष्णवी यांनी कळविले आहे.