जिल्ह्यात मानवी आरोग्य तपासणी व पशुचिकित्सा तपासणी शिबीर संपन्न

जिल्ह्यात मानवी आरोग्य तपासणी

व पशुचिकित्सा तपासणी शिबीर संपन्न

भंडारा, दि. 13 :  डॉ. बी. आर आंबेडकर असोशिएशन नागपूर पशुवैद्यकिय महाविद्यालय नागपूर व डॉ. बी. आर. आंबेडकर मेडोकोज नॅशनल असोशिएशन तसेच पशुसंवर्धन व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 एप्रिल 2023 रोजी शहापूर येथे भव्य पशुचिकित्सा व मानवी आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले.

या शिबीराच्या अध्यक्षस्थानी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोनकुंवर होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वाय. एस. बंजारी,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुंवर, वैद्यकिय अधिकारी डॉ. अंकित वासनीक, (रोग निदान तत्र), डॉ. सुयोग रत्नपारखी, जि.प. सदस्य आशाताई डोरले, ग्रामपंचायत सदस्य रिषिता मेश्राम, सरपंच ग्रामपंचायत शहापूर मंगलाताई देवगडे तसेच महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. विनोद धुत. डॉ. पी. एस. रघुवंशी, डॉ. जी. आर. भोजने, डॉ. एम. बावणकर, डॉ. जी. फिस्के, डॉ. एम. कांबळे, डॉ. एस. वरके, डॉ. एस. जाधव, तसेच विद्यालयातील 70 विद्यार्थी, IGMC चे 35 विद्यार्थी उपस्थित होते.

पशुचिकित्सा शिबीरा अंतर्गत 98 पशुपालकांच्या 153 जनावरांवर विविध औषधोपचार करण्यात आले तसेच 2 मोठया जनावरावर शस्त्रक्रिया व 5 मोठया शस्त्रक्रिया लहान जनावरांवर करण्यात आली. 37 वंधत्व तपासणी व गर्भधारणा तपासणी करण्यात आली.

मानवी शिबीरामध्ये 155 सिकलसेल तपासणी, 128 दंत तपासणी तसेच 257 नागरीकांची विविध आजारावरील आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबीराचे यशस्वी आयोजनासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. सविता वाढई व पशुधन विकास अधिकारी डॉ. हर्षदा गमे यांनी परीश्रम घेतले. तसेच शिबीराला पं. स. भंडारा पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.