जागतीक आरोग्य दिन तसेच उष्माघात संबंधीत आजार व इन्फ्लूएंझा एच3एन2 बाबत कार्यशाळेचे आयोजन

जागतीक आरोग्य दिन तसेच उष्माघात संबंधीत

आजार व इन्फ्लूएंझा एच3एन2 बाबत कार्यशाळेचे आयोजन

 

भंडारा, दि. 13 : जागतीक आरोग्य संघटनेकडून जगभरात जागतीक आरोग्य दिन दर वर्षी साजरा केला जातो. यादिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जागतीक आरोग्य दिन, उष्माघात संबंधीत आजार व इन्फ्लूएंझा एच3एन2 बाबत कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे घेण्यात आले.

 

या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरजी जिभकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेशजी पारधी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. जिभकाटे यांचे हस्ते दिपप्रज्वलन व धनवंतरी पुजन करुन कार्यशाळेची सुरवात करण्यात आली. कार्यशाळेला माताबाल संगोपण अधिकारी डॉ.मनिषा साकोडे, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र धनविजय, वैद्यकिय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. हिना सलाम तसेच जिल्हयातील उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक, तालुकास्तरावरील तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी आणि जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना श्री. जिभकाटे यांनी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार करण्याकरीता सर्व आरोग्य संस्थां सज्ज राहाव्यात याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवाहन केले.

 

कार्यशाळेबाबतचे प्रास्तावीक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुवर यांनी केले जागतीक आरोग्य दिनांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुगणालय डॉ.डी.के.सोयाम यांनी Health for All याबाबत माहिती दिली.

 

कार्यशाळेला उष्माघात संबंधीत आजार, प्रतिबंधात्मक कार्यवाही व उपचार याबाबत भिषक प्रयास हॉस्पिटलचे डॉ.संजय वाणे यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच भिषक सामान्य रुग्णालयचे डॉ. ईशांत करंजेकर यांनी इन्फ्लूएंझा एच3एन2 या विषयावर लक्षणे, निदान, व उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शन केले. बाल रोग तज्ञ, सामान्य रुग्णालय डॉ.सुचिता वाघमारे यांनी बालकांमध्ये उष्माघात व इन्फ्लूएंझा एच3एन2 मुळे आढळणारे लक्षणे, निदान, व उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शन केले.

 

कार्यशाळेचे सुत्र संचालन साथरोग शास्त्रज्ञ डॉ.श्रीकांत आंबेकर तर आभार प्रदर्शन जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सचिन चव्हाण यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरीता आरोग्य सहाय्यक राजू थाटकर, सुनिता मेहर, लक्ष्मीकांत नान्हे, सुमित जिभकाटे यांनी सहाकार्य केले.