जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न

जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न

गडचिरोली, दि.31: जिल्हा माहीती कार्यालय, गडचिरोलीचे लिपीक मनोहर बेले यांचा जिल्हा माहीती कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा माहीती अधिकारी सचिन अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष कांतीभाई सुचक, आशाताईं मनोहर बेले, मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सचिन अडसूळ म्हणाले की श्री बेले हे शातं स्वभावी व पुर्णवेळ आनंदी राहून काम करणारे कर्मचारी होते. त्यांनी कार्यालयातील कामावरील निष्ठा न सोडता सेवा दिली. बेलेनी गडचिरोली सारख्या जिल्हयात व चंद्रपूर येथे मिळून 38 वर्ष सेवा दिली. त्यांचे पूढील जीवन सुख समाधानाचे जावोत अश्या प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. याप्रंसगी मनोहर बेले हे सत्काराला उत्तर देताना भारावून गेले. कांतीभाई सुचक यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांचे कुंटुंबीय सदस्य आवर्जुन उपस्थित होते. कार्यकमाचे संचलन प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी तर आभार महादेव बसेना यांनी मानले. कार्यक्रमास गोवर्धन गोटाफोडे, नरेंद्र माहेश्वरी, प्रभाकर कोटरंगे, टावर मडावी, अनुप मेश्राम, दिनेश वरखेडे, स्वप्नील महल्ले, वामन खंडाईत, गुरुदास गेडाम, विजय लडके, के. एन. मारोठे, रेखाताई वंजारी, विजया इंगोले, तन्मय देशपांडे, सतीश क्षिरसागर, मुकेश गेडाम, नरेश बावणे, सुनिल मेघे, रमेश बट्टे, महेंद्र ठाकरे, आदी सहीत कार्यालयीन कर्मचारी , संपादक , पत्रकार बहुसंखेनी उपस्थित होते.