मधकेंद्र योजनेअंतर्गत मधमाशा पालण प्रशिक्षण संपन्न

मधकेंद्र योजनेअंतर्गत मधमाशा पालण प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली, दि.31: महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मधपाळ प्रशिक्षण मौज कुमरगुडा ता. भामरागड जिल्हा गडचिरोली येथे १० लाभार्थीस १० दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण दिनांक १५ मार्च २०२३ ते २४ मार्च २०२३ पर्यंत घेण्यात आले. कार्यक्रमाला संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, भामरागड स्वप्नील मगदूम. तहसीलदार, भामरागड श्री कांबळे तसेच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली भास्कर मेश्राम, व मधमाशा पालन प्रशिक्षक दत्तुभाऊ येरगुडे इत्यादी प्रमुख अथिती उपस्थित होते. संवर्ग विकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांनी अतिदुर्गम भागात कशाप्रकारे उद्योगाला चालना मिळेल या बद्दल सांगितली व श्री कांबळे तहसीलदार यांनी मधमाश्या पालनाचे फायदे व त्यापासून निर्माण होणारे रोजगार यांची माहिती दिली भास्कर मेश्राम जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी मंडळाचे विविध योजनाबद्दल माहिती दिली व प्रशिक्षक दत्तुभाऊ येरगुडे यांनी मधमाशा पालणा बद्दल माहिती दिली. तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे इतर कर्मचारी लखन गेडाम, शैलेश गोतमारे व हर्षल हुमणे उपस्थित होते. असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.