एम आर ट्रान्सपोर्ट ( रोडलाईन्स ) गोडाऊनवर धाड ३२०० किलो प्लास्टीक जप्त

एम आर ट्रान्सपोर्ट ( रोडलाईन्स ) गोडाऊनवर धाड

३२०० किलो प्लास्टीक जप्त

मनपा उपद्रव शोध पथकाची कारवाई

 

चंद्रपूर ३१ मार्च – चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे रहमत नगर येथील एम आर ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर धाड टाकुन ३२०० किलो प्लास्टीक पिशवी व खर्रा पन्नी जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या गोडाऊन धारकाकडुन ५००० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

श्री ओम प्लास्टिक यांच्या नावाने नोंद असलेल्या प्लास्टीक पिशव्या या गुजरात मधील हलोल शहरातुन तर लक्ष्मी चंद्रपूर या नावाने नोंद असलेल्या खर्रा पन्नी या रायपुर शहरातुन चंद्रपूर शहरात आल्याचे निदर्शनास आले आहे.सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली असुन पुन्हा सदर गुन्हा केल्यास मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले, सर्व व्यावसायिक,वितरक,हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.

सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,मनीष शुक्ला,राज हजारे, अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली