कामगार योजनांचा सचेतना कार्यक्रम 1 मे रोजी

कामगार योजनांचा सचेतना कार्यक्रम 1 मे रोजी

भंडारा, दि. 29 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे कामगार योजनांचा सचेतना कार्यक्रम 1 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय गणेशपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कामगार, आस्थापना मालक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.