अक्षय तृतीयाचे दिवशी बाल विवाहावर राहणार प्रशासनाची नजर Ø बालविवाहाची पुर्वकल्पना असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

अक्षय तृतीयाचे दिवशी बाल विवाहावर राहणार प्रशासनाची नजर

Ø बालविवाहाची पुर्वकल्पना असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 एप्रिल:  “अक्षय तृतीया 3 मे 2022 रोजी असल्याने अनेक विवाह या दिवशी पार पाडले जातात व यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाल विवाहाबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहावे व बाल विवाहाबाबत माहिती असल्यास जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले आहे.

कोरोना महामारीच्या काळात समाजात अल्पवयीन बालकांच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनत आहेत. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या एका वर्षाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या भागात एकूण 1338 बालविवाह रोखण्यात यश आले आहे. तसेच अध्यक्ष, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने अक्षयतृतीया हा विवाहास शुभ मुहूर्त असल्याने जास्तीत-जास्त विवाह या दिवशी आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकंदरीत बालविवाहाच्या परिस्थितीचा विचार लक्षात घेता बालविवाहास प्रतिबंध करण्याकरिता उपाययोजना करणे आवश्यक आहे. दि. 3 मे 2022 रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, तालुकास्तरावरील बाल संरक्षण समिती, अध्यक्ष तथा तहसीलदार व आपल्या अधिनस्त असलेल्या यंत्रणांना बालविवाह होऊ देण्याबाबत तत्पर राहण्याच्या सूचना द्याव्यात.

बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी व ग्रामीण), शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक तसेच गाव बाल संरक्षण समिती सदस्य, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बालविवाह प्रतिबंध अधिकारी व  ग्रामसेवक यांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.

लग्न कार्यात सेवा देणारे पुरोहित, मंगल कार्यालय व्यवस्थापक यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी बालविवाह थांबविण्याकरिता त्याची पूर्वकल्पना असल्यास संबंधित जिल्हा बाल संरक्षण कक्षा शी संपर्क साधावा. संपर्काकरिता 8999048202, 9011097192, 7020656496 अथवा जवळचे पोलीस स्टेशन, ग्रामसेवक व 24 तास सेवा पुरविणारे चाईल्ड लाईन 1098 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून बालविवाह रोखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अशा सूचना जिल्हा बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा तथा प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिले आहे.