आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिवती येथे आरोग्य शिबीर

0

आझादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर

जिवती येथे आरोग्य शिबीर

चंद्रपूर दि. 27 एप्रिल : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिवती येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी राजुराचे आमदार सुभाष धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिवती व पाटणकरीता आमदार स्थानिक विकास निधीतून 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार धोटे यांच्या हस्ते पार पडले. या आरोग्य शिबिरात 520 जणांची तपासणी करण्यात आली. यात 319 पुरुष तर 201 महिलांचा समावेश होता.

या शिबिराला शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथून कान, नाक व घसा तज्ज्ञ, फिजिशियन शस्त्रक्रिया तज्ज्ञांची टिम तर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथून बालरोग व नेत्ररोग तज्ज्ञ उपस्थित होते. या आरोग्य  शिबिरात कुष्ठरोग, क्षयरोग, हत्तीरोग, हिवताप, आयुष्यमान भारत कार्ड आदींची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचे स्टॉल लावण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे तर आभार डॉ. गजेंद्र अहिरकर यांनी मानले. यावेळी डॉ. रामदास अनकाळे, डॉ. कविता शर्मा, डॉ. आबिग शेख व जिवती तालुक्यातील  सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here