मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी  महाडीबीटीवर 30 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करा        

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी 

महाडीबीटीवर 30 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करा        

          भंडारा, दि. 25 : सन 2021-22 या वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी व परीक्षा फी या योजनेचे अर्ज भरण्याकरिता 14 डिसेंबर 2021 पासून महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलव्दारे 30 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे. तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनु. जाती प्रवर्गाचे अर्ज या कार्यालयाकडे तात्काळ सादर करावे. अनु. जाती प्रवर्गाचा एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.