पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दौरा

0

पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दौरा

भंडारा, दि. 22:- पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम 25 एप्रिल 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

25 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8.50 वाजता नागपूर विमानतळ येथून वाही विश्रामगृह ता. पवनी जिल्हा भंडारा कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता विश्रामगृह वाही ता. पवनी येथे गोसे प्रकल्पाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत व पवनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सकाळी 11.30 वाजता गोसेखुर्द ता. पवनी येथे गोसे प्रकल्पाची भेट व कामाची पाहणी. दुपारी 12.00 वाजता गोसेखुर्द येथून शासकीय वाहनाने भंडारा कडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आगमन व जिल्हास्तरीय आढावा बैठक. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथून शासकीय वाहनाने साकोली कडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता साकोली येथे आगमन व नगर परिषद, साकोली येथे अत्याधुनिक आठवडी बाजार व मटन मार्केट इत्यादी कामांचे भूमीपूजन. सायंकाळी 4.00 वाजता साकोली येथून सातोना ता. मोहाडी कडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वाजता सातोना ता. मोहाडी येथे आगमन व ग्रामपंचायत नवीन ईमारतीच्या लोकार्पण सोहळा व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या कामाचे भूमीपूजन तसेच घरकुल लाभार्थ्यांना गाव नमुना 8 चे वाटप. सायंकाळी 5.45 वाजता सातोना ता. मोहाडी येथून वाहनाने नागपूर कडे प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here