महिला मेळाव्यात महिला हक्काचा जागर

महिला मेळाव्यात महिला हक्काचा जागर

भंडारा, दि. 22 : सामाजिक न्याय भवनात सामाजिक कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे हक्क व अधिकार याबाबत जागर करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर सहभागी या मेळाव्यात मृणाल मुनेश्वर यांनी महिलांच्या हक्क व अधिकार याविषयी उपस्थित महिलांना उद्बोधन केले त्यांनी आपल्या अमोघ वाणीने महिला महिलांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक अधिकारांविषयीच्या काम प्रगतीवर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमात उपस्थित महिला मंडळींना बौद्धिक कार्यक्रमा सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा मेजवानी मिळाली.  राधा आतकरी प्राचार्या, जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष संस्था, यांनी बहुरंगी नृत्य नाटिका व गीतांद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या मेळाव्याला मायाताई ऊके, माजी सभापती महिला व बाल कल्याण समिती श्रीमती प्रिया शहारे, श्रीमती वैशाली सतदेवे समाजसेविका व सुकेशिनी तेलगोटे, सहायक आयुक्त, समाज कल्याण हे उपस्थित होत्या.

सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आले.  सर्वप्रथम प्रगती बागडे यांनी भीम गीत व पोवाडाचे गायन केले. श्रीमती प्रिया शहारे यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.  मायाताई उके यांनी महिला सक्षमीकरणावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपस्थित श्रोत्यांना सुकेशिनी तेलगोटे, सहा. आयुक्त यांनी सामाजिक समता कार्यक्रमाची रूपरेषा विषद करून प्रमुख पाहुण्यांचे आभार व समारोपीय मनोगत व्यक्त केले. त्यानंतर किर्ती व दिप्ती बोंबर्डे यांनी समारोपीय गीत गायन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा रामटेके यांनी केले. कार्यक्रमास कार्यालयाचे महिला कर्मचारी, वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती रजनी वैद्य व विद्यार्थीनी, तसेच भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व ईतर महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता सुकेशिनी तेलगोटे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.