आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारांकरीता भरती मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर, दि. 20 एप्रिल : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकरीता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपुर येथे 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय अप्रेंटीसशीप, शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहे.

फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक,टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, टूल अँड डाय मेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, सिओई ऑटोमोबाईल, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कार्पेंटर, शीट मेटल वर्कर, बॉयलर अटेंडंट, स्टेनो, आर.ए.सी, फ्रूट प्रोडक्शन, ॲडव्हान्स मशीन स्टुल आदी ट्रेड व्यवसायातील उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार तथा शिकाऊ उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहेत.

या भरती मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, संबंधित ट्रेड प्रमाणपत्र तथा शालेय प्रमाणपत्रासह  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्यम सभागृहात दि. 21 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती प्र.ही. दहाटे यांनी केले आहे.