राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि. 11 एप्रिल : राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, दि. 12 एप्रिल 2022 रोजी रात्री 9 वाजता हिराई गेस्ट हाउस, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.

बुधवार, दि. 13 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10 वाजता हवेली गार्डन, वडगाव प्रभाग येथे आगमन व चव्हाण ते ठाकरेवाडी पर्यंत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन. सकाळी 10.30 वाजता श्री. भट ते मराठा सेवा संघापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन. सकाळी 11 वाजता दत्तनगर येथील सिमेंट काँक्रीट नालीचे भूमिपूजन. सकाळी 11.30 वाजता दत्तनगर, सिव्हिल लाईन येथे पक्ष शाखेचे उद्घाटन. दुपारी 12 वाजता बंगाली कॅम्प चौक येथे पक्ष शाखेचे उद्घाटन. दुपारी 12.15 वाजता कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2 वाजता सर्किटाऊस, चंद्रपूर येथे जनता दरबार. सायंकाळी 4 वाजता सर्किट हाऊस येथून राहुरी जि. अहमदनगर कडे प्रयाण.