डॉ राजेश व उमा डहारे भोई समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

डॉ राजेश व उमा डहारे भोई समाज रत्न पुरस्काराने सन्मानित

सिंदेवाही

 प्रा. डॉ राजेश डहारे व सौ उमा डहारे दांपत्य यांना भोई समाज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रा डहारे हे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी चार पुस्तके व चौदा संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. नुकतेच त्यांना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पुरस्कार पाँडेचरी येथे प्रदान करण्यात आले होते. ते गोंडवाना विद्यापीठात व नागपूर विद्यापीठात प्राणीशास्त्र विषयाचे संशोधन मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विध्यार्थीनीने पि. एचडी मिळवली आहे. नुकतेच त्यांचे प्रोफेसर पदाचे प्रमोशन झालेले आहे. त्यांना भोई गौरव मासिकाकडून “समाज रत्न पुरस्काराने” विज्ञान व संशोधन या प्रवर्गात सन्मानित करण्यात आले. डॉ राजेश डहारे यांच्या पत्नी सौ उमा डहारे ह्या नुकत्याच कल्पवृक्ष महिला सहकारी पतसंस्था सिंदेवाही च्या अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आल्या. त्यांना सहकारासाठी भोई समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोन्ही पतिपत्नी ला सामाजिक कार्याची आवड आहे. दोघांना हा पुरस्कार राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, कवी ज्ञानेश वाकुडकर उपजिल्हाधिकारी स्नेहल कनीचे व प्राचार्य ढाले यांचे हस्ते देण्यात आले. या पुरस्काराबद्दल डॉ माधव वरभे, प्रा. शरद बिडवाईक, डॉ उमेश इंदूरकर, हरीभाऊ पा थोडे व अन्य मान्यवरांनी अभिनंदन केले.