chandrapur I महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, मुंबई दि. 16 एप्रिल : कोविड -19 संसर्गजन्य आजारामुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रीशिपच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी विजाभज, इमाव,व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुदतवाढ करणेबाबत मत व्यक्त करताना मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, विजाभज, इमाव,व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता म्यॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणाली मार्फत राबविल्या जातात. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षांमध्ये विजाभज, इमाव,व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व फ्रि- शिपकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च करण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. हे निदर्शनास येताच विजाभज, इमाव,व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रीशिपच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.