chandrapur I खाजगी बसेस यांना शासनाच्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

खाजगी वाहतुक व्यवस्था

खाजगी वाहने तसेच खाजगी बस सेवा, सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते रात्री ८.०० या वेळेमध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा अथवा निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० ते सकाळी ७.०० पर्यंत आणि शुक्रवार रात्री ८.०० ते सोमवार सकाळी ७.०० वाजेर्पत सुरू राहतील.

खाजगी बसेस यांनी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

खाजगी बसेस मधून बसणेच्या क्षमते इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. उभा राहून एकाही

प्रवाशाला प्रवास करणेस परवानगी असणार नाही. भारत सरकार देणेत आलेल्या निर्देशानुसार सर्व खाजगी वाहुतक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे लवकरात लवकर लसीकरण करणेत यावे. आणि लसीकरण पूर्ण होईपर्यत कोरोनाचे निगेटीव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र १५ दिवसांसाठी वैध असलेले जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम १० एप्रिल, २०२१ पासून लागू होईल.