जलदिना दिवशी हर घर जल व ओ.डी.एफ गावे घोषीत करणार -विवेक जॉनसन

जलदिना दिवशी हर घर जल व ओ.डी.एफ गावे घोषीत करणार -विवेक जॉनसन

 

चंद्रपुर. 21/03/2023 – २२ मार्च २०२३ रोजी जागतिक जलदिना निमीत्त ग्रामसभेची बैठक घेऊन ग्रामपंचायतीने त्यांच्या पाणी आणि स्वच्छता स्थितीचा विचार करून (HGJ) हर घर जल किंवा (ODF +) खुले शौचमुक्त दर्जा प्राप्त केलाबाबतचा, ठराव पास करण्यात येणार आहे. जिल्हयातील ग्रामपंचायती मध्ये हर घर जल व ओडीएफ प्लस बाबतचे ठराव २२ मार्च जलदिनाच्या ग्रामसभेत घेतल्या जाणार असुन, चंद्रपुर जिल्यातील जास्तीत जास्त गावे हर घर जल व ओ.डी.एफ घोषीत करावे .असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

 

खुले शौचमुक्त (ODF) भारत हा असाधारण मैलाचा दगड पुढे नेत, संपुर्ण ग्रामीण स्वच्छता शास्वत टिकवण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंर्तगत ग्रामीण लोकाचा सहभाग व जनजागृती करून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तीक शौचालयाची उपलब्धता करून देणे तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन गोबरधन मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन याबाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही करून ज्या गावांनी घन कचरा सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण केलेली आहे, त्यांनी त्यांच्या ग्रामसभेत स्वतःला ODF घोषित करणारा ठराव पास करावा. त्याचप्रमाणे, जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC) तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणी देणे आवश्यक आहे. त्यांनतर अशी गावे हर घर जल म्हणुन घोषित करणेत येणार आहे. त्यानुसार ज्या गावांनी जल जीवन मिशनचे निकष विचारात घेऊन गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC) तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा सुरु केला आहे अशा ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव घेण्यात येणार आहे. दि. २२ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक जल दिन म्हणुन साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक ग्रामपंचायतस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.जलपूजन करणे, जल प्रतिज्ञा घेणेत येणार आहे