पोलीस पाटील पदाकरिता अर्ज आमंत्रित

पोलीस पाटील पदाकरिता अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि.17 : उपविभागीय कार्यालय भंडारातर्फे भंडारा व पवनी तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती करावयाची असून ऑनलाईन अर्ज दि.17 ते 30 मार्च 2023 या कालावधीत www.sdobhnpolicepatil.in व www.bhandara.nic.in या वेबसाईटवर मागविण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी विहीत कालमर्यादेत अर्ज सादर करावा. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष पोलीस पाटील निवड समिती रविंद्र राठोड यांनी केले आहे.