कर्मचाऱ्यांचा संप त्वरित मागे घ्या. सरपंच संघटनेची मागणी.

कर्मचाऱ्यांचा संप त्वरित मागे घ्या. सरपंच संघटनेची मागणी.

◾तालुका सिन्देवाही सरपंच संघटनेची मागणी.

सिंदेवाही- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या पंचायत समिती सिंदेवाही येथील सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी यांच्याकडे कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्या म्हणून एकमताने निवेदन दिले आहे.त्यात त्यांनी म्हटलं आणी कि संपूर्ण राज्यात मागील 3 ते 4 दिवसापासून जुनी पेन्शन मिळण्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व कर्मचारी संपावर गेले असल्याने तालुक्यातील विविध विकास कामांना ब्रेक लागला आहे. तसेच सर्व जिल्हा परिषद शाळा,सरकारी दवाखाने,पंचायत समिती,ग्राम पंचायत या विभागात कर्मचारी नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेवटच्या सत्रातील शाळकरी मुलांच्या परीक्षा जवळ असूनही शिक्षकाविना शाळेतून घरी परत जावे लागत आहे.कोरोना काळात मुलांना घरीच राहून अभ्यास करावा लागला.त्याचप्रमाणे ग्रा.पं. मध्ये ग्रामसेवक,सचिव उपलब्ध नसल्याने त्या कार्यालयाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना आवश्यक दाखल्यासह विविध कामांसाठी खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे.तेव्हा आपण शासन स्तरावरून हा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये व विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.याचा विचार करून आपण शासन स्तरावरून वेळीच दखल घ्यावी.असा आशय निवेदनात मांडलेला आहे.

निवेदन देतांना राहुल बोडणे अध्यक्ष सरपंच संघटना तालुका सिंदेवाही व रत्नावर सरपंच ग्रा.पं.मुरमाडी तसेच तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच उपस्थित होते.