26 मे पर्यंत आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजीत

26 मे पर्यंत आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजीत

 

भंडारा दि. 16: जिल्ह्यातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएएसडीसी) यांच्या मार्फत आयोजीत करण्यात आला आहे.

 

या मेळाव्यामध्ये एनएसडीसी या डिजीटल प्लॅटफॉर्मवर विद्यार्थी आणि नियोक्ते यांची नोंदणी करिता 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2023 तर स्क्रिनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाईन करिता 20 ते 27 मार्च 2023 या कालावधीत करायची आहे. उमेदवार ऑनलाईन मॅपिंग 28 मार्च ते 10 एप्रिल 2023 पर्यंत तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फेऱ्या 11 एप्रिल ते 15 मे 2023 पर्यंत तर समारोप समारंभ 26 मे 2023 या कालावधीत राहील.

 

सदर जॉब फेअर मध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ लिंकवर तर विविध कंपन्या/उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

 

वरील टाईमलाईननुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल यांच्याशी 07184-252250 यावर संपर्क साधावा.