सोमवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोमवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

भंडारा दि. 16: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवारी 20 मार्च रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नविन टाकळी भगतसिंग वार्ड स्टेशन रोड भंडारा येथे प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटशीप मेळावा व पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या मेळाव्याच्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्त्यांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटशीप मेळावा व पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा येथे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. तसेच नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी 20 मार्च रोजी प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल यांच्याशी 07184-252250 यावर संपर्क साधावा.