31 ऑक्टोबरपर्यंत घुग्गुस शहरातील सर्व प्रकारची जड वाहने वाहतुकीस बंद

31 ऑक्टोबरपर्यंत घुग्गुस शहरातील

सर्व प्रकारची जड वाहने वाहतुकीस बंद

Ø नागरीकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 10 : घुग्गुस शहरातील रेल्वे ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. या वाहतूक समस्येबाबत दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाच्या नियमनासाठी घुग्गुस शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच जनतेला त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे अनुचित प्रकार घडून जिवित किंवा वित्तहानी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या संदर्भात नव्याने उपाययोजना करण्याचे आवश्यक झाले आहे.

 

याकरीता 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत अद्यापही रेल्वे ब्रीजचे बांधकाम पुर्ण न झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड कंपनीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने दि. 31ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने घुग्गूस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतुकीस बंद राहील. घुग्गूस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पिटल-बेलोरा ओवर ब्रिज मार्गे वणीकडे जाणारा रस्ता जड वाहतुकीस बंद राहील.

 

या पर्यायी मार्गाचा करा अवलंब :

 

पर्यायी मार्ग म्हणून वणीकडून घुग्गूसकडे येणारी जड वाहतूक राजीव रतन हॉस्पिटलपर्यंत येऊ शकेल. वणीकडून, घुग्गूस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा पाटाळा-वरोरा-भद्रावती-ताडाळी-पडोली घुग्गूस मार्गाचा अवलंब करावा. घुग्गूसकडून वणी जाण्याकरीता पडोली-भद्रावती-वरोरा मार्गाचा अवलंब करावा. असे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.