पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन

 

गडचिरोली, दि.३: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली, यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

सदर मेळाव्यामध्ये अध्यक्षस्थानी प्रकाश देशमाने, उपआयुक्त कौशल्य,रोजगार, उद्योजकता व विभागीय आयुक्तालय, नागपूर, प्रमुख पाहूणे मा. डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, व मार्गदर्शक म्हणून संतोष साळूंखे, प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली, श्री पवार जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली, योगेंद्र शेंडे,सहायक आयुक्त्, जिल्हा कौशल्य् विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली उपस्थित होते. मेळाव्यामध्ये विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते सदर कंपन्याकडे नोकरी करिता 67 रिक्तपदे व अप्रेंटिसशीप करिता एकूण 25 रिक्तपदे उपलब्ध् होते.

 

मेळाव्यामध्ये 141 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. सदर पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गचके, सहायक प्राध्यापक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, आणि सूत्रसंचालन श्रीमती प्रियंका इडपात्रे, यंग प्रोफेशनल,मॉडेल करिअर सेंटर,गडचिरोली व आभार प्रदर्शन गणेश चिमणकर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले. सदर रोजगार मेळावा यशस्वीकरण्याकरिता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी सहाकार्य केले.