सहानुभूतिच्या लाटेमुळे ‘चिंचवड’चा गड भाजपने राखला-हेमंत पाटील

सहानुभूतिच्या लाटेमुळे ‘चिंचवड’चा गड भाजपने राखला-हेमंत पाटील

कसबा विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या विजयाचे भाकितं ठरले खरे

मुंबई, २ मार्च २०२३

 

सहानुभूतीच्या लाटेमुळे भारतीय जनता पक्ष चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाला आहे.पंरतु, टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने भाजपचा गड समजला जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदार संघात अडीच दशकानंतर पक्षाचे पानिपत झाले, अशी प्रतिक्रिया इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी दिली.यापूर्वीच पाटील यांनी कसबाची जागा कॉंग्रेसकडे जाणार, तर चिंचवड चा गड भाजप राखणार असे भाकितं केले होते. ही भाकिते पोटनिवडणुक निकालाच्या निमित्ताने आज खरी ठरली आहेत.

 

 

 

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना असा थेट सामना झाला. अशात अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली. मात्र, कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने मतदारानी मतपेट्यातून त्यांची नाराजी व्यक्त करीत भाजप उमेदवाराला पराभूत केले.टिळक कुटुंबियांवर झालेला राजकीय अन्यायामुळे या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचे पारडे जड झाले.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे जेष्ठ मंत्री मतदार संघात ठान मांडून देखील आहेत ही हातची जागा भाजप-शिवसेना युतीला गमवावी लागली.

 

चिंचवड मध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली.जगताप यांच्या पाठीशी सहानुभूतिच्या लाटेचा फायदा पक्षाला झाला. किमान ही जागा राखून ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सर्व नेतेमंडळी मतदार संघात ठाण मांडून होती. पंरतु पैशांच्या बळावर या पोटनिवडणुका ‘हाय प्रोफाईल’ बनल्या होत्या, असा पुनरुच्चार पोटील यांनी केला.