पोलीस उपनिरीक्षक गोपिचंद नेरकर यांचे सत्कार व निरोप समारोह कार्यक्रम

पोलीस उपनिरीक्षक गोपिचंद नेरकर यांचे सत्कार व निरोप समारोह कार्यक्रम
पुरोगामी पत्रकार संघ शाखा- सिंदेवाही च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.

सिंदेवाही
पोलीस स्टेशन सिंदेवाही मधील पी.एस.आय. गोपिचंद नेरकर यांची पोलिस उपनिरीक्षक पदांवर बढती झाली असून मुंबई येथे बदली सुद्धा झाली आहे.


पोलीस उपनिरीक्षक गोपिचंद नेरकर हे मुळ जळगांव जिल्ह्यातील आहेत. सिंदेवाही पोलीस स्टेशन ला सन २०१९ रोजी रुजु झाले होते. सन २०२० रोजी कोरोणाने पुर्ण देशभरात पाय पसरलेला होता.
त्या काळात डाक्टर व पोलिस विभागावार सर्वात मोठी जबाबदारी आली होती. त्या काळात लोकांची सेवा करत शांतता व सुवेवस्था राखण्याचा काम सिंदेवाही पोलिस विभागाने मोठ्या उत्तम रीतीने पार पाडला होता. या संघर्षातून जात असताना पंधरा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोणाची लागन झाली होती. त्याही परिस्थितीत गोपिचंद नेरकर यांनी जनसामान्य माणसात आपल्या कर्तृत्ववान कामगिरीने मनमिळावू स्वभावाने लोकांची व पोलिस कर्मचाऱ्यांची मने जिंकलीत. नेरकर यांच्या बढती झाल्याचा आनंद तर आहेच पण सिंदेवाही पोलिस विभागातुन एक महत्त्वाचे व्यक्ति बाहेर गेल्याचे अनेकांना त्यांची कमी जानवत आहे.
गोपिचंद नेरकर यांच्या संपुर्ण कार्याची दखल घेत पुरोगामी पत्रकार संघ सिंदेवाही यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष मिथुन मेश्राम, उपाध्यक्ष कुणाल उंदीरवाडे, सचिव सुनिल गेडाम, अमोल निनावे,अमन कुरेशी, मुकेश शेंडे, आक्रोश खोब्रागडे, अंबादास दुधे, विरेंद्र मेश्राम, जितेंद्र नागदेवते, उपस्थित होते.