‘अनुभव लेखन कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील अनुभव लेखन उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा

‘अनुभव लेखन कशासाठी ? लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील

अनुभव लेखन उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा

भंडारा, दि. 16 :  नागरिकांमध्ये निवडणूक व त्यासंदर्भात जागृती व्हावी, त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी या हेतूने निवडणूक कार्यालयाकडून जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी महिला दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या कार्यालयाकडून ‘अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील अनुभव लेखन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सर्वसामान्यांनी त्यांचे अनुभव/ लेख 25 मार्च 2022 पर्यंत पाठवावयाचे आहेत.

‘अनुभव लेखन कशासाठी? लिंगभाव समतेसाठी’ या विषयावरील अनुभव लेखन या उपक्रमात भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संदीप कदम यांनी नागरिकांना केले आहे.