मनरेगा योजनेअंतर्गत धोप ग्रामपंचायतीच्या पडीत 21 एकरावर वृक्ष लागवड

मनरेगा योजनेअंतर्गत धोप ग्रामपंचायतीच्या

पडीत 21 एकरावर वृक्ष लागवड

मनरेगा योजनेतुन सामान्य नागरिकांव्यतीरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट साध्य केले आहे. मोहाडीतील धोप ग्रामपंचायतीने केलेल्या वृक्षलागवडीची ही यशकथा

पंचायत समिती, मोहाडी अंतर्गत ग्रामपंचायत धोप येथे नरेगा योजनेतून ग्रामपंचायतीच्या पडीत 21 एकर जमिनीवर फळबाग व वृक्ष लागवड करण्याचे प्रयोजन आखण्यात आले. ग्रामपंचायतीकडे असलेल्या जमिनीवर शेतकरी व गावकरी यांनी अतिक्रमण करण्यास सुरवात केली होती. ग्रामपंचायतीच्या लक्षात ही बाब येताच कर्तव्यदक्ष ग्रामपंचायतीने शासकीय जागा अतिक्रमित न होऊ देण्याचा निर्धार केला. पर्यायी स्वरूपात त्या जमिनीवर कुठल्याही स्वरूपाची कामे करून ती जागा ग्रामपंचायतीकडे राहील याचा विचार करण्यात आला.

आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये कर्तव्यदक्ष ग्राम रोजगार सेवक, सरपंच व ग्रामसेवक यांनी सदर पडीत जागेवर आपण नरेगा योजने अंतर्गत फळबाग व वृक्ष लागवड करून सदर जमिनीचे संरक्षण करण्यात येईल पर्यायाने गावातील मजुरांना रोजगार सुद्धा उपलब्ध होईल तसेच भविष्यात फळबागांच्या उत्पन्नातून ग्रामपंचायतीस आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल असा प्रस्ताव ग्रामसभेपुढे ठेवण्यात आला. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत यास संमती दिली.

ग्रामसभेच्या संमतीनुसार ग्रामपंचायतीने आर्थिक वर्ष 2012-13 च्या नियोजन आराखड्यात सदर कामाचा समावेश करण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेकरिता प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास सादर करण्यात आला. पंचायत समिती स्तरावरून सदर कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार आर्थिक वर्ष 2012-13 च्या पावसाळ्यात फळबाग लागवड कामास सुरवात करण्यात आली.

ग्रामपंचायत धोप 90 टक्के लोक हे शेती व्यवसाय व शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गावातील बहुतांश जमीन ही कोरडवाहू असल्याकारणाने खरीप हंगामानंतर त्यांनतर मजुरांना काम नव्हते. मजुरांना तेंदूपत्ता, मिरची व इतर रोजगारासाठी बाहेर गावी काम करण्यास जावे लागत असे. मजुरांना गावातच कामे व रोजगार मिळावे या सर्व बाबींची निकड व गरज लक्षात घेता ग्रामपंचायतीने पडीत जमिनीवर मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग योजना घेण्यात आली. ग्रामपंचायतीने फळबाग व वृक्ष लागवड कामावर झालेल्या अकुशल खर्चाच्या तुलनेत ग्रामपंचायत धोप येथे विविध कुशल कामे करण्यात आलीत. ज्यामुळे गावाच्या विकासात सदर फळबाग व वृक्ष लागवडीचे महत्वाचे योगदान झाले आहे.

करिता यांनतर ग्रामसभेच्या संमती नुसार कुटुंब लखपती व समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीमधील बचत गट महिला ज्यात प्राधान्याने विधवा महिला, अपंग, परितक्त्या महिला व भूमिहीन मजूर यांना सदर जिवंत असलेल्या प्रजातीनुसार प्रत्येक गटास 1000 झाडे संगोपनासाठी देण्यात येण्याचे प्रयोजन आहे जेणेकरून जिवंत असलेली 15000 फळबागांची झाडे (साग झाडे वगळून) यातून येणारे उत्पन्न सदर गटास मिळेल व त्यातून कुटुंब समृद्ध होण्यास मदत होईल. तसेच यापुढे मोहगनी, निलगिरी व चंदनाची झाडे लावण्याचा मानस ग्रामपंचायतीचा असून भविष्यात ग्रामपंचायतीस उत्पन्न मिळू शकेल.

फळबाग व वृक्ष लागवडीमुळे मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला. फळबागांच्या व वृक्ष स्वरूपाच्या कामातून निर्माण स्वरूपाच्या कामातून निर्माण कुशल खर्चातून पायाभूत सुविधेची गावविकासाची कामे करता आली. ग्रामपंचायतीस उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. अतिक्रमणास आळा घालता आला.

शैलजा वाघ दांदळे,

जिल्हा माहिती अधिकारी,  भंडारा