राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न मुलांमध्ये औरंगाबाद तर मुलींमध्ये लातूर संघाची बाजी

राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

मुलांमध्ये औरंगाबाद तर मुलींमध्ये लातूर संघाची बाजी

भंडारा, दि. 23 :गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत तलवारबाजीच्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये 14 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये प्रथम औरंगाबाद, व्दितीय अमरावती तर तृतीय क्रमांकावर पुणे संघाने स्थान मिळाले. तर 14 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये प्रथम लातूर, व्दितीय नागपूर तर तृतीय क्रमांक मुंबई संघाने पटकावला.

 

22 फेब्रुवारी रोजी शुभारंभ झालेल्या या स्पर्धेत सांघिक प्रदर्शनासोबतच वैयक्तिक तलवारबाजीची कौशल्य खेळाडूंनी दाखवली. या स्पर्धेत राज्यातील एकुण 196 खेळाडू, पंच, संघ व्यवस्थापक सहभागी झाले होते. बॅडमिंटन हॉलला झालेल्या या स्पर्धेत खेळाडू मुलांची व मुलींची निवासाची व्यवस्था उत्तम करण्यात आली होती.

 

वैयक्तिक प्राविण्य प्राप्त खेळाडुमध्ये 12 मुले व 12 मुलींचा समावेश आहे. त्यामध्ये इपी या खेळ प्रकारात साईप्रसाद जंगवाड ,प्रथमेश कस्तुरे, पौरस देशमुख, संकेत आंभोरे, तर फॉईल प्रकारात श्रीराज चिकणे, स्वराज डोंगरे, यशोवर्धन देशमुख, पौरस देशमुख, सेबर या खेळ प्रकारात स्पर्श जाधव, सैयद हुसैन, श्रेयश कुरंजेकर, आदित्य मघाडे, तर मुलींमध्ये इपी या खेळ प्रकारात जान्हवी जाधव, आशना चौधरी, वैष्णवी वाकडे, रोहिणी पाटील, फॉईल या खेळ प्रकारात आशना चौधरी, समृध्दी पाटील, कनक भोजने, गौरी पाटील, तर सेबर या खेळ प्रकारात जान्हवी जाधव, पार्थी हुमने, तनुजा लहाने, भक्ती सोनवणे यांनी प्राविण्य प्राप्त केले.

 

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांसह उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग,नागपूर शेखर पाटील, संजिवकुमार बांडेबुचे, अध्यक्ष,भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन व श्री. सुनिल कुरंजेकर सचिव,भंडारा जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांनी श्रम ‌घेतले.