हत्तीरोग निर्मूलनासाठी गोळयांचे सेवन करण्याकरीता प्रशासनाचे आवाहन

हत्तीरोग निर्मूलनासाठी गोळयांचे सेवन करण्याकरीता प्रशासनाचे आवाहन

गडचिरोली, दि.23: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 10 ते 20 फेबुवारी 2023 दरम्यान चामोर्शी व आरमोरी या दोन तालुक्या हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सामुदायिक औषधोपचार मोहीम आरोग्य कर्मचार्यांमार्फत खाऊ घालण्यात येत आहे. वरील दोन्ही तालुके हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी हि मोहीम राबविली जात आहे. 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीकोनातून आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी टीम द्वारे दिवस पाळीत किवा रात्रो पाळीत जेवण झाल्यानंतर शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, अंगणवाडी व कार्यालये इत्यादी ठिकाणी बूथ चे नियोजन व गावोगावी गृहभेटी द्वारे गोळ्या खाऊ घालण्यात येत आहे. सामुदायिक औषधोपचार मोहीमेत आत्तापर्यंत वरील दोन तालुक्यात 83.32 टक्के लोकांनी गोळ्या सेवन केल्या आहेत. स्वत: जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य कर्मचार्यांना सर्व नागरिकास गोळ्या खाण्याचे आवाहन केले आहे. गोळ्या सुरक्षित असून ते सेवन करणे हा हत्तीरोग संसर्ग रोखण्याचा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी कळविले आहे. हत्तीरोग दूरीकरणाकरिता चामोर्शी व आरमोरी तालुक्यात 10 ते 20 फेबुवारी या कालावधीत 3 दिवस शाशकीय सुट्या आल्याने गोळ्या खाऊ घालण्याचे उदिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही त्यामुळे सदर मोहिमेचा कालावधी दिनांक 25 फेबुवारी 2023 पर्यंत वाढवून 100 टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालून उदिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना मा. सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांनी दिलेले आहे वरील दोन्ही तालुक्यातील ज्या लोकांनी गोळ्या सेवन केले नाहीत त्यांनी या मोहीम कालावधीत गोळ्या सेवन करावे व हतीरोगाचे उच्चाटन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले आहे.