अल्पसंख्याक बेरोजगार युवकांसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू इच्छुकांनी लाभ घ्यावा

अल्पसंख्याक बेरोजगार युवकांसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू इच्छुकांनी लाभ घ्यावा

 

भंडारा, दि. 21 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथे 18 ते 40 वयोगटातील अल्पसंख्याक बेरोजगार युवक – युवकांसाठी अल्पमुदतीचे निशुल्क शासनमान्य रोजगारक्षम व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या सुवर्णसंधीचा इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा. या अभ्यासक्रमासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. सध्या सी.एन.सी ऑपरेटर टर्निंग प्रशिक्षण कालावधी 450 तास व इलेक्ट्रीकल टेक्नीशियन प्रशिक्षण कालावधी 200 तास हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सी.एन.सी ऑपरेटर टर्निंग शैक्षणिक पात्रता दहावी अधिक आय. टी. आय. पास ही आहे. अधिक माहितीसाठी ए. एम. डोंगरे -9423414840 व एस.बी. माहोरे 9403348426 यांना संपर्क करावा असे प्राचार्य , शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा यांनी केले आहे.