जिल्हाधिकारी यांच्या हस्ते योग शिबिराचे उदघाटन

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते योग शिबिराचे उदघाटन

 

चंद्रपूर २० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिका, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराद्वारे अनुक्रमे २२ व २४ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे घेतली जात असुन सिव्हील लाईन परीसरातील हुतात्मा स्मारक येथे नवीन योग शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आज करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी योग प्राणायाम आवश्यक असुन या शिबिरांद्वारे शहरातील नागरीकांचे स्वास्थ्य निरोगी राखण्याचे कार्य केले जात आहे. नियमित योगसाधना करणारे शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व स्थिर असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती – योगनृत्य परीवाराच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी मनपाद्वारे योग शिबिरे घेतली जात आहेत. योग समिती, योगनृत्य परिवार व मनपा यांची संयुक्त योग समितीद्वारे २८ योग वर्ग व २८ योगनृत्य वर्ग असे एकुण ५६ वर्ग घेतले जात आहेत.

याप्रसंगी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ, वनिता गर्गेलवार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. शरयु गावंडे,डॉ. नरेंद्र जनबंधु, महीला पतंजली योग समितीतर्फे स्मिता रेभनकर उपस्थीत होते.