अहेरी वार्षिक आमसभा तारखेत बदल दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आमसभा होणार  

अहेरी वार्षिक आमसभा तारखेत बदल दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आमसभा होणार  

 

गडचिरोली, दि.17: पंचायत समिती, अहेरी, सन 2022-23 ची वार्षिक आमसभा धर्मरावबाबा आत्राम, आमदार, अहेरी 69 निर्वाचन क्षेत्र तथा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला 11.00 वाजता अहेरी पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित केली होती. परंतु काही कारणास्तव आमसभाचे तारखेत बद्दल करुन आमसभा दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ला आयोजीत केली आहे.तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व समाजमाध्यम प्रतिनिधी, पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी तथा नागरीक, तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित राहुन वार्षिक आमसभेत सहभाग घेण्याचे आपणास आवाहन करण्यात येत आहे. असे सदस्य सचिव तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अहेरी यांनी कळविले आहे.