रोजगार मेळाव्याला या, नियुक्तीपत्र घेऊन जा..

रोजगार मेळाव्याला या, नियुक्तीपत्र घेऊन जा..

अकराशे पेक्षा जास्त पदांची होणार भरती

 

भंडारा, दि. 15 : जिल्हयातील सर्वात मोठया रोजगार मेळाव्याचे आयोजन उदया दि.16 फेब्रुवारी रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर (MIET) याठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.

 

या रोजगार मेळाव्यामध्ये स्थानिक जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील नामाकिंत कंपन्यानी त्यांच्याकडील 1100 पेक्षा जास्त पदाची मागणी नोंदविलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणा नुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांची व मुलींची भंडारा व मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर (MIET) यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजनक करण्यात आले आहे. स्थानिक जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील नामाकिंत कंपन्यानी त्यांच्याकडील 1100 पेक्षा जास्त पदाची मागणी नोंदविलेली आहे. या मेळाव्यामध्ये Moil Ltd.Dongari Buz. Dist Bhandara, Ashok Layland Ltd. Gadegaon Dist.Bhandara, LIC OF INDIA BRANCH BHANDARA, STAR HEALTH AND ALLIED INSURANCE, CO.LTD. Bhandara, MMP Industries Limited Maregaon Shahapur Dist. Bhandara, Fiat Automobile Ltd. Ranjangaon Pune, Shridhar Spinners Pvt. Ltd. Amravati, Dhoot Transmision Pvt. Ltd. Aurangabad, VAIBHAV ENTERPRISES NAPS AND NATS TPA, PATALE EDUCATION SKILL FOUNDATION NAGPUR, VsnapU Professional Photography service Mumbai, L & T CONSTRUCTION SKILLS TRAINING INSTITUTE, PANVEL ( MUMBAI ), Allied Resource Management Services India Pvt. Ltd Pune, Distil education and technology Pune, NSSL PVT LTD MIDC Hingana Nagpur, NAVABHARATH FERTILIZERS LTD NAGPUR, UTKARSH SMALL FINANCE BANK NAGPUR/GONDIA इ. कंपन्यांनी त्यांच्याकडे शैक्षणीक पात्रतानिहाय पदांची मागणी नोंदविलेली आहे.

 

तरी नोकरीसाठी इच्छुक उमेदवांरानी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा Mega Job fair Bhandara -5 येथे ऑनलाईन पध्दतीने अप्लाय करावा तसेच जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी .16 फेब्रुवारी प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास‍, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र, जिल्हा क्रिडा संकुल, भंडारा यांचेशी 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. (Email.Id-bhandararojgar@gmail.com).