“महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021” पुस्तिकेचे राज्यस्तरीय वार्षिक प्रकाशन

“महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021” पुस्तिकेचे राज्यस्तरीय वार्षिक प्रकाशन

 

मा.महोदय, श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे शुभ हस्ते कारागृह विभागाची ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021’ पुस्तिकेचे दिनांक 9/02/2023 रोजी ‘दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय पुणेä’ येथे राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात प्रकाशन करण्यात आले.

सदरच्या प्रकाशन कार्यक्रमास विशेष आमंत्रित मा.श्रीमती जुगनू गुप्ता तसेच मा. श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग पुणे, मा. श्री. योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग मुंबई, मा.श्री. सुनिल ढमाळ, प्रभारी कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय पुणे, मा. श्री सी. ए. इंदुरकर प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय पुणे, तसेच श्रीमती सुनेत्रा पाटील सांख्यिकी अधिकारी, व कारागृह विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

मा.महोदय, श्री. अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021’ पुस्तिकेचे राज्यस्तरीय वार्षिक प्रकाशनाच्या प्रसंगी केलेले प्रास्ताविक-

· या प्रकाशनात जानेवारी ते डिसेंबर-2021 या कालावधीतील ‘कारागृह व सुधारसेवा’ विभागाची रचना व कार्यपध्दती तसेच कारागृहनिहाय बंदीक्षमता, बंदीसंख्या, बंदीप्रकार, बंदींचे गुन्हे प्रकारानुसार वर्गीकरण, दाखल व सुटलेले बंदी, शिक्षा कालावधीनुसार व वास्तव्यानुसार बंदी वर्गीकरण, बंदींसाठी उपलब्ध करुन देण्यात येणा-या सोयी-सुविधांचा तपशील, कारागृह उद्योगनिहाय व शेतीतील विविध पिकांचे एकूण उत्पादन तपशील, प्रशिक्षण व खर्चाचा तपशील इ. बाबींची संख्यात्मक माहितीचा समावेश केला आहे.

· ‘कारागृह व सुधारसेवा’ प्रशासनास शासकीय योजनांचे नियोजन व अंमलबजावणी करणे, धोरणात्मक निर्णय घेणे व संशोधकांना अभ्यास करणेसाठी तसेच स्वंयसेवी संस्थांना कारागृहात विविध उपक्रम राबविणेसाठी ‘महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी 2021’ या प्रकाशनाचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्ती केली आहे.

कारागृह विभागाची ठळक सांख्यिकी

1. राज्यात एकूण 60 कारागृहे असून यात 9 मध्यवर्ती, 30 जिल्हा, 20 खुले कारागृहे व 1 किशोर सुधारालय यांचा समावेश होतो.

2. राज्यातील कारागृहांची एकूण बंदीक्षमता 24722 त्यापैकी 23402 (95%) पुरुष व 1320 (5%) स्त्री बंदीक्षमता आहे.

3. सन-2021 ची 34818 सरासरी एकूण बंदी संख्या असून त्यापैकी 96% (33405)पुरुष सरासरी बंदी व 4 % (1413) स्त्री सरासरी बंदी आहे.

4. सद्यस्थितीत दि.31.01.2023 अखेर

· राज्यातील कारागृहात 41075 एकूण बंदी असून 96% (39504) पुरुष, स्त्री 3.96% (1556) व तृतीयपंथी 15 (0.04%) आहेत.

· यात 19% (7949) सिध्ददोष बंदी, 80% (32917) न्यायाधीन बंदी व 1% (209) स्थानबध्द बंदी आहेत.

· राज्यात 1.48% (606) विदेशी बंदी असून यामध्ये 6%

· (36) सिध्ददोष बंदी व 94% (570) न्यायाधीन बंदी आहेत.

5. कारागृहांची दि.31 डिसेंबर रोजीच्या बंदीसंख्येचे बंदीक्षमतेशी प्रमाण (Occupancy Rate)

सन 2017 : 136.19%

सन 2019 : 152.72%

सन 2021 : 148.80%

सन 2018 : 148.93%

सन 2020 : 128.70%

सन 2021 मध्ये राज्याचा देशात सातवा क्रमांक

6. महाराष्ट्र राज्यात दि.31.12.2021 रोजी सर्वात जास्त बंदी संख्या 5966 येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. सदरचे कारागृह सर्वात मोठे असून त्या खालोखाल बंदी संख्या अनुक्रमे 4471 ठाणे म.का., 3424 मुंबई म.का., 2819 तळोजा म.का. मध्ये आहे.

· बंदीक्षमतेपेक्षा सर्वात जास्त बंदीची सरासरी गर्दीचे प्रमाण (Occupancy Rate) मध्यवर्ती कारागृहात 161% आहे. त्यापैकी 300% पेक्षा जास्त मुंबई म.का. (376%), कल्याण जि.का. (364%), ठाणे म. का. (347%), नांदेड जि.का. (305%) ही चार कारागृहे व बंदीक्षमतेच्या 201% ते 300 % पर्यंत बंदीची गर्दी असणारी 5 कारागृहे आहेत. बंदीक्षमतेच्या 101% ते 200 % पर्यंत बंदीची गर्दी असणारी 17 कारागृहे आहेत.

7. माहे जानेवारी 2023 अखेर राज्यात बंदीक्षमतेपेक्षा दुप्पट व त्यापेक्षा जास्त बंदी असलेली (Occupancy Rate) एकूण 18 कारागृहे आहेत.

· यामध्ये प्रामुख्याने मुंबई मध्यवर्ती कारागृह (446%), ठाणे मध्यवर्ती कारागृह (389%), बुलढाणा जि.का. (387%), कल्याण जि.का. (376%), सोलापूर जि.का. (360%), नांदेड जि.का. (318%) व येरवडा म.का. (285%) यांचा समावेश होतो.

8. कारागृह उद्योग व शेती-

· सन 2021-22 मध्ये कारागृहातील कारखाना उद्योगाचे ₹ 11.10 कोटी व शेतीचे ₹ 2.36 कोटीचे उत्पादन झाले आहे. बंदींनी उद्योग व शेती यामधील विविध व्यवसायात विशेष कौशल्य संपादन केल्यास त्यांच्या सुटके नंतर रोजगार किंवा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यास मोलाची मदत होऊन, त्यांचे पुनर्वसन होणेस मदत होते.

· कारागृह उद्योगांतर्गत सुतारकाम, शिवणकाम, लोहारकाम, यंत्रमाग, हातमाग, बेकरी, चर्मकला, धोबीकाम, कागद कारखाना, रंगकाम, रसायन उद्योग, मोटार सर्व्हिसिंग, मूर्ती काम इत्यादी उद्योग चालविले जातात.

· प्रामुख्याने यामध्ये सर्वात जास्त स्थूल उत्पादनांत सुतारकाम (₹4.46 कोटी), लोहारकाम (₹1.55 कोटी), बेकरी (₹1.08 कोटी), यंत्रमाग (₹1.05 कोटी), शिवणकाम (₹1.03 कोटी), हातमाग (₹0.87कोटी) ªÉÉ उद्योगांचा वाटा आहे.

· सर्वात जास्त येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे ₹2.99 कोटी व त्यानंतर अनुक्रमे अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे ₹1.77 कोटी, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे ₹1.72 कोटी, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे ₹ 1.54 कोटी, कारखाना उत्पादनाचे स्थूल मुल्य आहे.

· कारागृहातील बंदीना दैनंदिन आहारासाठी लागणारा भाजीपाला, अन्नधान्य हे 60 कारागृहापैकी शेती क्षेत्र असलेल्या 31 कारागृहामध्ये 330.88 हेक्टर क्षेत्रावर उत्पादीत केला जातो.

· सन 2021-22 मध्ये पैठण खुले कारागृहात सर्वात जास्त ₹53.62 लाखाचे कृषी उत्पादन झाले असून, पैठण खुले कारागृहाचा प्रथम क्रमांक, विसापूर खुले कारागृहाचे (₹32.10 लाख) व्दितीय क्रमांक तर कोल्हापूर खुले कारागृहाने (₹19.98लाख) तृतीय क्रमांक कृषि उत्पादनांत मिळविला आहे.

· सन 2021 मध्ये कोव्हिड-19 साथरोगाच्या प्रादर्भाव झाल्याने मा.उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंदींना विशेष रजा मंजूर करण्यात आली होती, त्यामुळे एकूण बंदीसंख्या कमी झाल्याने कारागृह उद्योग व शेती उत्पादनात घट झाली आहे.

9. सन 2021 मध्ये कारागृह विभागात अधिकारी व कर्मचारी यांची एकूण 5068 पदे मंजूर असून 4217 अधिकारी व कर्मचारी विविध पदांवर कार्यरत होते.