यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

Ø 2 हजार 803 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

 

चंद्रपूर, दि. 11 : चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत 34 कोटी 98 लाख 14 हजार 400 रुपये निधी मंजूर झालेला आहे . जिल्ह्यातील मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर या चार तालुक्यातील 2 हजार 803 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले आहे.

 

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी याबाबतचे मान्यता व निधी वितरणाबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. मूल तालुक्यातील बेंबाळ, केळझर, जुनासुर्ला, फिस्कुटी, गांगलवाडी, खालावसपेठ, चकदूगाळा, चितेगाव, विरई, चिरोली, मरेगाव, आकापूर, ताडाळा, दाबगाव मक्ता, सुशी दाबगाव, राजगड, नवेगाव भुज, बाबराळा, उथळपेठ, नलेश्वर, मारोडा, पिपरी दीक्षित, चिचाळा, मुरमाडी, बोरचांदली, राजोली, नांदगाव, गोवर्धन, टोलेवाही, चिमढा, टेकाडी, सिंतळा,येरगाव, उश्राळा, भवराळा, चांदापूर, जानाळा,मोरवाही, चिखली, कोसंबी,काटवन, डोंगरगाव, भादुर्णी, हळदी, भेजगाव, गाडीसुर्ला या गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

पोंभुर्णा तालुक्यातून चेक आंबेधानोरा, देवाडा खुर्द, घाटकुळ, चक फुटाणा, भीमणी, बोर्डा बोरकर, बोर्डा झुल्लरवार, आष्टा, चेक आष्टा, उमरी पोतदार, कसरगट्टा, जामतुकूम, देवाडा बुज, दिघोरी, घनोटी तुकूम, थेरगाव, जामखुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातून गिलबिली, आमडी, दहेली, कवडजई, किन्ही, मानोरा, लावारी, हडस्ती, ईटोली, विसापूर, कळमना, पळसगाव, कोठारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

चंद्रपूर तालुक्यातून चकनिंबाळा, पायली, आरवट, पडोली, मामला, चकवायगाव, पिपरी, वरवट, वढा, शेनगाव, मारडा, बोर्डा, येरूर, नागाळा, पडोली, जुनोना, गोंडसावरी, चिंच्चपल्ली, बेलसनी, महाकुर्ला, गोंडसावरी, चिचाळा, नकोडा, जुनोना, मारडा या गावांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून समावेश करण्यात आला आहे. लवकरच घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे.