लेखा व कोषागारे विभाग हा शासनाच्या वित्तीय प्रशासनाचा कणा- कोषागार अधिकारी बाविस्कर

लेखा व कोषागारे विभाग हा शासनाच्या वित्तीय प्रशासनाचा कणा- कोषागार अधिकारी बाविस्कर

 

भंडारा दि. 6 :लेखा व कोषागारे विभाग हा शासनाच्या वित्तीय प्रशासनाचा कणा आहे असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी लखिचंद बाविस्कर यांनी केले.

 

दरवर्षी 1 फेब्रुवारी हा दिवस कोषागारे दिन म्हणुन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी लखिचंद बाविस्कर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सहायक संचालक स्थानिक निधी लेखा सीमा नन्होरे, स्टेट बँक मॅनेजर अरविंद कुमार, अपर कोषागार अधिकारी अभय निनावे, नंदनवार, लेखाधिकारी डोणे व सेंगर इत्यादी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे जिल्हा कोषागार अधिकारी पदावर नव्याने रुजु झालेल्या बाविस्कर यांचे स्वागत करण्यात आले. संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती (DATSWA) तर्फे अमरावती येथे आयोजित राज्यस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत विविध खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमास जिल्ह्यातील लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, उपलेखापाल तसेच कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सतिष मगर यांनी केले तर आभार प्रकाश पटले यांनी मानले.