जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

 

भंडारा दि. 6 : नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा, प्रशासनात लोकाभिमुखता यावी, कारभार पारदर्शक व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात देखील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू होणार आहे. या कक्षाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर असेल. विभागीय आयुक्त कार्यालयात जानेवारी 2020 पासून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यरत झाला आहे. पण आता जिल्हा पातळीवर कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, ग्रामीण भागातील प्रश्न तातडीने सुटावे या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहे. त्यानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात मुख्यमंत्र्यांना उद्देशून असलेले अर्ज, निवेदन, तक्रार स्वीकारण्यात येतील. तसेच संबंधितांना पोहच पावती दिली जाईल. त्याचबरोबर आलेली तक्रार तातडीने संबंधित विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कक्षाच्या कामाचा आढावा दर महिन्याच्या लोकशाही दिनात घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात टपाल शाखेच्या बाजूला हा कक्ष असणार आहे.