विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन….

बॉल-बॅडमिंटन खेळाडु विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा अभाविप चा इशारा

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल-बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींचा चमू पाठविण्यात आला होता. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक विजय सोमकुवर हे होते. मात्र, या दोघांनी चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील ‘चार्जर’ मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले. पूर्ण वेळ हे दोघे दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. सदर बाब ही अभाविप च्या लक्षात येताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार रोजी सरदार पटेल महाविद्यालयाचे उप-प्राचार्य माधमशेट्टीवार यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत निवेदनातुन सखोल चौकशी करून दोषींना निलंबित करण्याची मागणी केली आहे व त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर चे जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार यांनी इशारा दिला.