मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या गरीब, आदिवासी, बेरोजगाराना रोजगार देण्यासाठी प्रयत्न व्हावेत.- डॉ. शिलू चिमुरकर, आरमोरी   

देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तरुणांना आणि सर्व वर्गातील लोकांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न यातून होताना दिसत आहे. एकलव्य स्कुलमध्ये ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती आणि साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची घोषणा झाली, ही चांगली बाब आहे. यात दुर्गम आणि आदिवासी भागात शैक्षणिक सुविधा आणि आरोग्याच्या सोयीसाठी विशेष तरतुदी अपेक्षित होत्या. नवीन 157 नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. अशी नर्सिंग महाविद्यालये आदिवासी भागात होण्याची गरज आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या गरीब, आदिवासी, बेरोजगाराना रोजगार देण्यासाठी प्रयत्न व्हावेत.- डॉ. शिलू चिमुरकर, आरमोरी