chandrapur I चंद्रपूर जिल्हा भाजपाची बैठक संपन्न.

संघटनात्मकदृष्ठ्या जिल्हा दीपस्तंभासारखा व्हावा

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर जिल्हा भाजपाची बैठक संपन्न

मातृभूमीचा,भारतमातेचा उत्कर्ष हा एकच विचार भारतीय जनता पक्षाचा आहे.हा अनुशासनप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.सत्ताप्रिय नाही तर ही सत्यप्रिय पार्टी आहे.जे यश आज पदरात पडले त्यासाठी अनेकांनी त्याग केला व बलिदान दिले.यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम व सूक्ष्म नियोजन आवश्यक असते.आगामी काळात ते करावे.संघटनात्मकदृष्ठ्या चंद्रपुर जिल्हा दिपस्तंभासारखा व्हावा असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले.ते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे शनिवार(२०)ला भाजपा (ग्रा)चंद्रपूर जिल्हा आढावा बैठकीचा समारोप करताना बोलत होते.
या आढावा बैठकीला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,नगराध्यक्ष हरीश शर्मा,भाजपा जेष्ठनेते विजय राऊत,प्रमोद कडू,राजेंद्र गांधी,महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे,प्रदेश कामगार मोर्चा सरचिटणीस अजय दुबे,भाजपा महामंत्री संजय गजपुरे,कृष्णा सहारे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम,माजी आमदार सुदर्शन निमकर,संजय देवतळे,जैनुद्दीन जव्हेरी,उपाध्यक्ष रेखा कारेकर,जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे,महामंत्री नामदेव डाहूले,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची उपस्थिती होती.

आ.मुनगंटीवार म्हणाले,चंद्रपुर जिल्ह्याला पक्षाने भरभरून दिले.भाजपाच्या ६५ संघटनात्मक जिल्ह्यापैकी चंद्रपुर जिल्ह्यावर पक्षाचे विशेष प्रेम आहे.त्यामुळे अनेक पद व मंत्रिपद आपल्याला मिळाली.भाजपाचा विचार घराघरात पोहोचावा म्हणून ही पदं मिळाली.हा आमचा नाहीतर कार्यकर्त्यांचा गौरव होता.पक्षाच्या विचारांवर प्रेम असेल तर पक्ष मोठा होतो.असे ते म्हणाले.

यावेळी हंसराज अहीर म्हणाले,भाजपा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.बूथ रचना योग्य असली तर निवडणूक जिंकण्यास मोलाची मदत होते.पक्षाच्या धोरणा प्रमाणे काम करा.सोशल मीडिया चा योग्य वापर करा,असे आवाहन त्यांनी केले.केंद्र शासनाला बदनाम करण्याचे षडयंत्र आज सुरू आहे.कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत,तरी हेतू पुरस्सर अपप्रचार केला जात आहे.त्याचा अभ्यास करून कार्यकर्त्यांनी बोलते झाले पाहिजे.असे ते म्हणाले.

प्रास्ताविकपर उद्बोधन करीत देवराव भोंगळे यांनी भाजपाच्या जिल्यातील कार्याचा आढावा घेत अनेक सूचना केल्या.बूथ संपर्क अभियानाची सविस्तर माहिती दिली ,नुकत्याच झालेल्या जिल्ह्यतील ग्रामपंचायतच्या निवडणूकिमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले ,आगामी नगर परिषद-नगरपंचायत निवडणूक,जि प- पं स पोट निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन केले तसेच कोरोनाकाळातील जनतेचे वीजबिल माफ करावी व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दयावी या मागणीसाठी दिनांक 24 फेब्रुवारीला होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात होणाऱ्या जेलभरो आंदोलनाची सविस्तर माहिती दिली ,कार्यकर्ता प्रशिक्षण,डिजी बीजेपी एप या बाबत त्यांनी मार्गदर्शक सूचना केल्या.वेळेवर काम करा,एकत्रितपणे काम करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच आनंद कोरे,अनिल डोंगरे,महेश बोरकर,हरिदास झाडे,उपसरपंच नामदेव लांजेवार,अशोक निब्रड यांचा आ. मुनगंटीवार व हंसराज अहीर यांचें हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातीलबूथ संपर्क अभियानाच्या अनुषंगाने पदाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली .बैठकीचे संचालन संजय गजपुरे यांनी केले,तर नामदेव डाहूले यांनी आभार मानले.