‘भाजयुमो’ तर्फे 19 फेब्रुवारीपासून युवा वॉरियर्स अभियान

0

‘भाजयुमो’ तर्फे 19 फेब्रुवारीपासून युवा वॉरियर्स अभियान

महाराष्ट्रप्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरु करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी या शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून या अभियानाचा प्रारंभ होईल, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी सांगितले की, युवा वॉरियर्स अभियानाअंतर्गत राज्यभरातील विविध क्षेत्रात आवड असणाऱ्या युवकांना एकत्रित आणून त्यांना रुची असणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सशक्त भारताच्या निर्माणासाठी युवकांचे योगदान फारच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यास त्याचा फायदा देशाला होऊ शकतो. विविध क्षेत्रातील युवकांनी लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग व्हावे आणि देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे या हेतूने भाजयुमोतर्फे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा समारोप 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here